बारामती, ता. 15- धनंजय मुंडे यांचा प्रश्न हा वैयक्तिक स्वरुपाचा आहे, यात तपास सुरु आहे, पोलिस तपास करीत आहेत, जो पर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत या विषयावर बोलणे उचित होणार नाही, पक्षाचे नेते या बाबत योग्य निर्णय करतील, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र धनंजय मुंडे यांनी स्वताःहून सर्व परिस्थिती सर्वांसमोर ठेवली आहे, त्या मुळे जे जेन्युयन आहेत अशा शब्दात त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत त्यांच्याबद्दल जर कोणी व्यक्ती षढयंत्र करत असेल तर त्यात खोलात जाण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या मनात खोट असती तर ते व्यक्त झाले नसते, पण ते व्यक्त होतात याचा अर्थ समजून घ्यायला हवा की ती व्यक्ती जेन्युयन आहे.
आज लिमटेकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथे रोहित पवार यांनी सपत्नीक ग्रामपंचायत निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनीही या प्रसंगी मतदानाचा हक्क बजावला.
#RohitPawar #DhananjayMunde #Grampanchayat #Baramati