चित्रा वाघ यांनी आज पूजा चव्हाण प्रकरणी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत. या प्रकरणात अद्याप साधा FIR का झाला नाही.तपास आधिकारी लगड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी करून वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. लेखी तक्रार नसल्यामुळे एफ आय आर दाखल केली नाही असे पोलिसांनी सांगितल्यावर चित्रा वाघ पोलीस निरीक्षक यांच्यावर संतप्त झाल्या आहेत.पुणे पोलिसांची या प्रकरणी पहिल्या दिवसापासून भूमिका संदिग्ध आहे. पोलिस हातावर हात ठेऊन बसले आहेत. त्यांच्यावर राजकिय दबाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तपास काढून घ्यावा आणि महाराष्ट्रातील एखाद्या आपीएस अधिका-याकडे द्यावा असे चित्रा वाघ यांनी सांगितले.