राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर भाजपा नेत्याकडून खंडणी मागितली असल्याचे आरोप केले. या आरोपांना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. विद्या चव्हाण यांनी माझ्यावर लावलेले आरोप सिद्ध करून दाखवावे, असे आवाहनही त्यांनी दिले आहे.