सरसकट बंद हा जिल्हा प्रशासनाकडून मोगलाईचा प्रकार; निर्णय बदला अन्यथा उद्रेक होईल :शिवेंद्रसिंहराजे

Sarkarnama 2021-06-12

Views 0

व्यापारी व व्यावसायिक सर्व प्रकारचा टॅक्स भरतात, परवानगी घेऊन व्यवसाय करतात. त्यांनाच कोरोना वाढत असताना बंदी करणे योग्य नाही. सरसकट बंदला साताऱ्यातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. कोरोना वाढतोय म्हणून सगळेच बंद करा हा जिल्हा प्रशासनाकडून मोगलाईचा प्रकार सुरू आहे. हे थांबविले पाहिजे. यापूर्वीच्या लॉकडाउनला व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी थांबायला तयार नाहीत. प्रत्येकाच्या नरड्याला आले आहे. राज्य सरकारने एकदम सरसरकट बंद करणे योग्य नाही. तातडीने निर्णय बदलावा. अन्यथा लोकांत उद्रेक होईल, असा इशारा साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS