आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास शिवप्रेमींचा उद्रेक होईल | एकनाथ शिंदे

Maharashtra Times 2021-12-18

Views 194

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं ते म्हणाले आहेत. असं असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणं अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचं असून तसं झालं नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS