पारगाव (जि. पुणे) : शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाढदिवस कोरोनोचा वाढत्या संसर्गामुळे साजरा न करता श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांसाठी व कोरोना योद्धांसाठी दहा हजार सॅनिटायझर बॉटल, पन्नास हजार फेस मास्क व एक लाख कुटुंबांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, या आरोग्य किटचे वाटप केले जाणार आहे. भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे यांनी आढळराव पाटील यांचा 65 वाढदिवस असल्याने 65 नागरिकांच्या कोरोनो लसीकरणासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले.
#corona #politics #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics