अहिल्यादेवी जयंतीबाबत राम शिंदे यांनी केले हे आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी ३१ मे ला त्यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी येथे मोठ्या उत्साहाने आपण साजरी करत होतो. परंतु , कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत महाराष्ट्रात लॅाकडाऊन असल्याने यावर्षी " श्री क्षेत्र चोंडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथे अहिल्यादेवी होळकर यांचा २९६वी जयंती कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीही आपण क्षेत्र चोंडी येथे जयंती साजरी करू शकलो नव्हतो.आपणा सर्व अहिल्या भक्त व श्रद्धाळूंना नम्र विनंती करतो की, सोमवार दि. ३१ मे २०२१ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती कोरोना महामारी असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून घरीच जयंती साजरी करावी अस आव्हान राम शिंदे यांनी केलं आहे .
#Ramshinde #AhilyabaiHolkar #Chondi #Jamkhed #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics