ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाकडून राज्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे राज्यातील अनेक मोठे नेते या चक्काजाम आंदोलनात नेतृत्व करताना दिसत आहेत. सरकारने इम्पिरिकल डाटा जमवून त्या आधारावर आरक्षण मिळवून द्यावं, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. तसेच, काँग्रेसच्या आंदोलनावर देखील भाजपाकडून टीका करण्यात आली आहे.