शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरावर भाष्य केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून देशात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.