कऱ्हाड : राहुल तुम्हे आणा है, देश को बचाना है... मोदी हटाव, देश बचाव..., पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे..., कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, या ना अशा अनेक घोषणा देत आज कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली काढून निषेध नोंदवण्यात आला. कऱ्हाड शहरातील कोल्हापुर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन कॉंग्रेसच्या सायकल रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीत आमदार चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष नगरसेवक आप्पा माने, इंद्रजीत गुजर, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, राजेंद्र चव्हाण, वैभव थोरात, प्रा. धनाजी काटकर, दिपक पिसाळ, शिवाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#Karad #RahulGandhi #Congress #PrithvirajChavan #CycleRally #CycleRallyKarad