Angarki Sankashti Chaturthi 2021: दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

Sakal 2021-07-27

Views 819

Angarki Sankashti Chaturthi 2021: दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
Pune: कोरोनाच्या पाश्वभूमीवर मंदिर बंद असले तरी आज अंगारकी चतुर्थीच्या (Angarki Sankashti Chaturthi 2021) निमित्ताने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या (Dagdusheth Ganpati )दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. आज अंगारकी चतुर्थीच्यानिमिताने (Angarki Sankashti Chaturthi 2021) ट्रस्टच्या वतीने मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्याव लागणार आहे. भक्तांनी गर्दी न करता ऑनलाईनच्या माध्यमातूनच बाप्पाच दर्शन घावं असं आव्हान देखील ट्र्स्टच्यावतीने करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust)कोषाधक्ष्य महेश सूर्यवंशी यांनी दिली.
#AngarkiSankashtiChaturthi #DagdushethGanpati #Pune #Coronavirus

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS