पुरग्रस्तांच्या मदतीला कुटे सोशल फाऊंडेशन धावले

Sakal 2021-07-31

Views 374

बीड(Beed) : उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कुटे ग्रुपच्या कुटे सोशल फाऊंडेशनच्या(Kute Social Foundation) आपत्तीच्या काळात कायम मदत असते. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात पीएम व सीएम केअरला मदत करणाऱ्या या ग्रुपने गरिबांना कपडे व अन्नधान्य वाटप केले. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात मोफत भोजन सुविधा पुरवली. पोलिसांसाठीही सेंट्रल ऑक्सीजन लाईनचे काम करुन दिले. आता पश्चिम महाराष्ट्र व कोकणात आलेल्या महापुरामुळे बाधीतांसाठी उत्तम प्रतिचे कपडे, रग, महिनाभर पुरेल येवढे किराणा साहित्य असे पाच हजार किट पाठविले आहेत. कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकिय संचालिका अर्चना सुरेश कुटे व आर्यन कुटे यांच्या उपस्थितीत साहित्य रवाना झाले. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#KuteGroup #SocialWork #Beed #HelpingFloodVictims #Sakalmedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS