औरंगाबाद : पीरबावडा, ता. फुलंब्री परिसरात जवळपास दोन महिने झाले तरी पाऊस न झाल्यामुळे मका, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके हातची गेली आहे. पाण्याअभावी मका पिके पिवळी होऊन करपून गेली आहेत. शिवाय कपाशी पिकाने सुद्धा माना टाकल्या आहेत. त्यामुळे आता पाऊस आला तरी त्याचा काहीच फायदा होणार नसून शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. शिवाय नदी, नाले, विहिरी अद्याप कोरड्या असल्याने विद्युत पंपाद्वारे पाणी भरणे सुद्धा अश्यक्य झाले आहे. तरी शासनाने परीसरातील गावातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावे अशी मागणी होत आहे.
#aurangabad #aurangabadnews #aurangabadliveupdates #aurangabaddraught #aurangabadfarmer #draughtsituationindaurangbad