कोरोना(Corona) लशीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यात आलीय...यामुळं आता अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांचीही लोकल प्रवासात भर पडलीय..त्यामुळे लोकलमधील गर्दी वाढणारे. आजपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मॉलही सुरू झाले आहेत. लशींचे दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेशाची अट आहे... मॉल मध्ये अनेक नियमांचं पालन करून सध्या ग्राहकांना प्रवेश दिला जातोय. मुंबईत(Mumbai) आजपासून मैदानं, उद्यानं सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्याचसोबत चौपाट्याही मुंबईकरांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत नागरिकांना परवानगी असणार आहे.पालिकेनं याबाबत नवी नियमावली जारी केली आहे.
#mumbai #localtrains #mumbailocaltrains #localtrainsinmumbai