कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कन्या योगिता गवळीसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (8 मे रोजी) लग्नबेडीत अडकणार आहेत. लॉकडाऊनचे नियम पाळत हा विवाह पार पडणार आहे. खरेतर हे लग्न 29 मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, अक्षय आणि योगिता यांचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. लग्नाला 15 ते 20 नातेवाईकांचीच उपस्थिती असणार आहेत.
लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. योगिताला आज संध्याकाळी हळद लागणार आहे.
#LokmatNews #Arungawali #don #yogitagawali
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber