आपण नेहमी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार पहातो, पण सोलापूरमध्ये चहात खाद्यकलर घालून चहा विकला जायचा.. चहाला रंग चांगला चांगला येत असल्याने गिर्हाईकंही भरपूर यायची पण अन्न व औषध प्रशासनाला याची कुणकुण लागली आणि त्यांनी थेट केजीटी चहा कंपनीच्या कारखान्यावर धाड मारून चहा जप्त केला.. कारखन्यात काम करणाऱ्या सुपरवायझरच म्हणणं आहे की ते कोणतीही भेसळ करत नाहीत, जे सप्लायर त्यांना माल पुरवतात तसाच माल पॅक करून ते पुढे विकतात, मात्र माल घेताना कोणतीही टेस्ट केली जात नाही ,मालाचा कोणताही रिपोर्ट घेतला जात नाही आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी मात्र खेळ केला जातो.
#tea #chai #teapowder #chailover #adulteration #solapur #maharashtra #marathi #marathinews #sakal #sakalnews #sakalmarathinews