नाशिक : काश्मीरच्या बांदीपोरामध्ये येथील हाजीन भागात बुधवारी(दि.११) पहाटे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र मिलिंद किशोर खैरनार शहीद झाले. दरम्यान, मिलिंद यांचे वडील किशोर खैरनार यांनी केंद्र सरकारने अतिरेक्यांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे सांगितले.