विवादात राहणे म्हणजे बिहार स्कूल एज्यूकेशन बोर्डाचे भूषण आहे. ताज्य माहिती नूसार सिमरी बख्तियारपूर विभागातील सिटनाबाद पंचायती च्या सिहरसा येथील गंगाप्रसाद गावातील विद्यार्थीनी प्रियंका सिंह हिने मँट्रिक ची परिक्षा दिली. रिझल्ट आल्यावर तीला नापास घोषित केले. कारण तीला संस्कृत मध्ये १०० पैकी ९ आणि विद्न्यानात ८० पैकी २९ गुण मिळाले असे सांगितले. स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास असणा-या या विद्यार्थीनी ने उत्तर पत्रीकांची पुनर तपासणी करण्याचा अर्ज हि दिला. परंतु बोर्डाने " नो चेंज " म्हणून फेटाळला. प्रियांका ने उच्च न्यायालायात धाव घेत, तीची उत्तर पत्रीका न्यायालयात सादर करण्यास सांगीतले. बोर्डाने तीला ४०,०००/- रूपये जामीन भरण्यास सांगीतले. तीने भरले ही. कोर्टात बोर्डाने आणलेल्या उत्तर पत्रीका मधील हस्ताक्षर आणि प्रियांका चे हस्ताक्षर यात तफावत असल्या चे आढळून आले. त्या नंतर ख-या उत्तर पत्रीका शोधल्यावर त्यात " बार कोडिंग " पद्धतीने बदल करण्यात आल्या चे आढळले. ज्या योगे दूसरी विद्यार्थीनी संतुष्टी कुमारी हिला संस्कृत आणि सायंस मधे नापास असून पास करण्यात आले आणि प्रियांका ला पास असून नापास करण्यात आले. उच्च न्यायालयाने हे तपशील मान्य करून प्रियांका हिला मानसिक त्रास दिल्या बद्दल बोर्डाला ५ लाख रूपये तीन महिन्यात तीला देण्याचे फर्मावले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews