सैराटच्या आर्चीच होणार पुनरागमन | Aarchi Come Back | लोकमत मराठी न्यूज | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 1

सैराटमुळे प्रसिद्ध झालेली रिंकू राजगुरूच्या चाहत्यांना तिचा पुढचा चित्रपट कोणता असेल याची उत्सुकता लागली आहे. रिंकूचं यश हे एका चित्रपटापुरता मर्यादीत होतं का ती यापुढेही दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार हे अनेकांना पाहायचं आहे. त्यामुळे तिच्या दुसऱ्या चित्रपटाची बरेच दिवस प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. या सगळ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून रिंकू लवकरच आणखी एका मराठी चित्रपटात दिसणार आहे. ‘रिंगण’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांच्या नव्या चित्रपटात ती काम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. ‘उदाहरणार्थ’ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सुधीर कोलते यांनी या पूर्वी ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती,ज्यात विनय पाठक यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाच्या निमित्तानं सुधीर कोलते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत.

या चित्रपटातील रिंकूची भूमिका नेमकी कशी असणार आहे, चित्रपट हा कुठल्या धाटणीचा आहे याबाबत अजून खुलासा करण्यात आलेला नाही. या चित्रपटाविषयी माहिती देताना मकरंद माने म्हणाले की, ‘चित्रपट सर्वांना भावेल अशी मला खात्री वाटते. रिंकूच्या रूपाने या चित्रपटासाठीतील नायिकेचा शोध पूर्ण झाला. चित्रपटाची गोष्ट ऐकून तिनंही तत्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला’

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS