सरकारने शेतकर्यांकच्या मागण्यांना कडे दुर्लक्ष म्हणून त्याच्या निषेधार्थ 2 नाेव्हेंबरपासून बेमुदत शेतकरी अाक्राेश राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार अाहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेद्वारे शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने झालेला अपमान, कर्जमुक्तीप्रकरणी हाेत असलेली टाळाटाळ, शेती मालाला हमीभाव ह्या मागण्या शेतकऱ्यांनी ठेवल्या होत्या .. आधी पण शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत राज्यव्यापी अांदाेलन केले होते. त्या वेळी सरकारने समस्यांचे निवारण केले जाईल, असे अाश्वासन दिले होते..गेल्या 20 वर्षांत सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या असून दिवसेंदिवस शेतकरी अात्महत्या वाढतच अाहेत. शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघेल इतका हमीभाव ठरवून मिळावा, संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी,जीवनावश्यक वस्तूंच्या मूळ किमतीला महागाई मानण्यात येऊ नये.संपादरम्यान शेतातील माल शेतातच ठेवणे, दूधविक्री न करणे, शेतीमाल बाजारापर्यंत न पाेहोचवणे अशा प्रकारचे मार्ग स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews