हाय हाय प्रफुल ... असे काही संवाद कानावर पडले की ओठांवर हसू उमटल्या शिवाय राहणार नाही. खिचडी ही मालिका लोकांच्या खूपच पसंतीस पडली. म्हणून या मालिकेवर चित्रपट तयार झाला होता पण तिकीट खिडकीवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.
सुप्रिया पाठकच्या खिचडी मालिकेतील हंसा या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली होती. इतकी वर्षं उलटली तरीही यातील पात्र, कथानक, शीर्षक गीत अशा सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनात आहेत. अशात ‘खिचडी’ नव्या अंदाजात, प्रमुख पात्रांना घेऊन, या अजरामर मालिकेचा नवीन पर्व लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया मालिकेच्या नव्या पर्वाची निर्मिती करणार असल्याचं समजतंय. अनेक लोकप्रिय मालिका नव्या रंगात - ढंगात येत आहेत. पण खिचिडी हि मालिका नक्की कशा स्वरूपात असेल याचे इतक्यात तरी माहिती नाही. पण आता हे नक्की पाहण्यालायक असेल की खिचडी तिचा स्वाद कसा जपते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews