चीनमध्ये राष्ट्रगीताचा अवमान केल्यास घडते हे ! | International News | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 1

एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभे राहायचे की नाही यावरून वाद-विवाद सुरू असताना चीनने मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. चीनच्या संसदेत राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्यासंबंधी कायदा संमत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यानुसार राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते,सप्टेंबर महिन्यात चीनने आपले राष्ट्रगीत ‘मार्च ऑफ द वॉलिंटिअर्स’चा अपमान करणा-यांना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यासंबंधीचा कायदा संमत केला होता. हा कायदा चीनव्याप्त हाँगकाँग आणि मकाऊलाही लागू होता. संसदेने यानंतर राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांसाठी गुन्हेगारी कायद्यात काही बदल करून फौजदारी खटला दाखल करू शकतो, का यावर विचार केला

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS