अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ११ डिसेंबर २०१७ ला इटलीत विवाहबध्द झाले.त्यावर पंजाब-हरियाणा कोर्टाचे वकील हेमंत कुमार यांनी १३ डिसेंबर २०१७ ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे माहितीच्या अधिकाराखाली विरुष्काच्या लग्नाबाबत माहिती मागवली होती. यानंतर रोम स्थित भारतीय दूतावासाकडून यावर उत्तर मिळाले. नियमानुसार, भारतीय नागरिकाने जर दुसऱ्या देशात लग्न केले तर ते विदेशी विवाह अधिनियम -१९६९ अंतर्गत नोंद केले जाते. मात्र, विरुष्काचे लग्न या अधिनियमांतर्गत झाले नाही. आता विराट अनुष्का ज्या राज्यात राहतील, त्या राज्याच्या नियमानुसार, विवाहाची नोंदणी करण्यासाठी त्यांना पुन्हा लग्न करावे लागण्याची शक्यता आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews