म्ही कधी निष्ठावान कर्माचाऱ्यांना वेळेच्या आधी कार्यालयात येतात आणि उशीरा थांबातात म्हणून कंपनीबाहेर हाकलल्याचे ऐकले आहे का? नाही ना? मग स्पेनमधली अजब गजब घटना पहा. स्पेनमधल्या लिडल या प्रसिद्ध सुपरमार्केट चेनने मॅनेजरला घरचा रस्ता दाखवला आहे. जीन असं या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने ‘लिडल’ विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ‘युरो न्यूज’नं दिलेल्या माहितीनुसार जीन हे गेल्या अनेक वर्षांपासून लिडलच्या शाखेत काम करत आहेत. ते नेहमीच वेळेच्या आधी शाखेत यायचे आणि जास्तवेळ थांबायचे. इतर कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तजवीज ते आधीच करून ठेवायचे, यामुळे इतर कर्मचाऱ्यांचा वेळ वाचायचा. पण कंपनीने मात्र अशा प्रकारे थांबणं हे नियमांचे उल्लंघन करण्यासारखं आहे असं सांगत त्यांना कामावरून काढून टाकलं आहे. लिडिलमध्ये ओव्हर टाईम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबदला दिला जात नाही किंवा येथे ओव्हर टाईम हा प्रकारच अस्तित्त्वात नाही पण तरीही जीन थांबतात, ते सुपर मार्केटमध्ये अनेकदा एकटेच असतात अशी क्षुल्लक कारणं सांगत त्यांना कामावरून काढून टाकल्याचं युरो न्यूजनं म्हटलं आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews