आपल्याकडे समाज माध्यमांवर व्हायरल झालेली गोष्ट म्हणून एखादा ट्रेण्ड फॉलो केला जाते. मात्र त्यामागील मूळ उद्देश काय आहे हे खूपच कमी जणांना ठाऊक असते. वास्तविक ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेण्ड नसून ती एक सामाजिक मोहीम आहे. परदेशात मागील अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. यामागे पुरुषांचे आरोग्य आणि खास करून प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जगरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे. 1999 साली ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेचा मुख्य हेतू असा होता की कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केस गळू लागतात. तर चेहऱ्यावर वाढणाऱ्या केसांसाठी खर्च होणारे पैसे एक महिनाभर बाजूला टाकून ते कॅन्सरसंदर्भातील मोहिमेला दान करायचे. या मोहिमेसंदर्भातील सर्व माहिती no-shave.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews