भक्तगण कार्तिक पोर्णिमा व अर्धकुंभाच्या निमित्ताने गंगाघाटावर जमले होते. हजारो भक्तगणांची गर्दी झाली असताना काली मंदिरात दर्शनाच्यावेळी गुदमरून तीन वयस्कर महिलांचा मृत्यू झाला. बिहार येथील सिमारीया घाट येथे सकाळच्या वेळी प्रचंड गर्दीत गुदमरल्याने त्या मरण पावल्या. अशी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सुरवातीला हा चेंगराचेंगरीचा प्रकार होता असे सांगितले होते परंतु नंतर घुमजाव करत
केवळ भाविकांची जास्त गर्दी झाल्याने जीव गुदमरून ऐंशी वर्षे वयाच्या या महिला गुदमरून मरण पावल्याचे सांगितले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. सिमारीया घाटानजिक काळी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. मंदिराकडे जाणारा मार्ग चिंचोळा होता त्यामुळे या महिला गर्दीत सापडून बेशुद्ध पडल्या व नंतर मरण पावल्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews