कॉमेडियन कपिलच्या अर्ध्याहून अधिक विनोदांमध्ये लग्नांवरचे विनोद अधिक असतात इतकेच काय ? कपिलने केलेल्या पहिल्या चित्रपटात ३ बायकांचा नवरा झाला होता. रुपेरी पडद्यावरचा पण का होईना ? अनुभव गाठीला नक्कीच होता.कपिलचा हाच अनुभव सध्या खऱ्या आयुष्यात घेणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मा प्रेयसी गिन्नी चत्रथसोबत पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहे. कॉलेजच्या दिवसांपासून कपिल आणि गिन्नी एकमेकांना ओळखतात. मैत्रीपासून सुरुवात झालेल्या या नात्याचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. आता या नात्याला एक पाऊल पुढे नेत कपिल आणि गिन्नी विवाहबद्ध व्हावे अशी दोघांच्याही कुटुंबीयांची इच्छा आहे. कपिल व्यसनमुक्त झाल्यावरच त्याच्यासोबत लग्न करेन असे गिन्नीचे म्हणणे आहे. कपिल यासाठी बंगळुरू येथील व्यसनमुक्ती केंद्रातही उपचार घेत होता. गिन्नीचे म्हणणे ऐकून त्याने दारू पिणे सोडले आहे. त्याच्या आगामी ‘फिरंगी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही तो सज्ज असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी हे दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews