विराट कोहली हा देशातला श्रीमंत खेळाडू आहे. गेल्या महिन्यात फोर्ब्सनं जगभरातील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये विराटचाही समावेश आहे. विराट हा सोशल मीडियावरही सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे. इन्स्टाग्रामवर सक्रीय असणाऱ्या विराटचे १ कोटी ६७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विराटच्या प्रत्येक इन्स्टा पोस्टवर हजारो कमेंट आणि लाईक्सचा ‘पाऊस’ असतो. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे विराटला दिवसाला जवळपास तीन कोटींची कमाई होते. आपल्या पोस्टमधून एखाद्या ब्रँडला प्रसिद्धी द्यायची असेल तर विराट ३.२ कोटींच्या आसपास मानधन घेतो. सध्याच्या घडीला विराट कोहलीची संपत्ती १४.५ मिलियन डॉलर असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. कमाईच्याबाबतीत विराटने जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews