केंद्र सरकारला राहुल गांधी ह्यांची भीती वाटते. शरद पवारांचे प्रतिपादन | Sharad Pawar Latest News

Lokmat 2021-09-13

Views 115

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार आणि विद्यमान राज्यकर्त्यांना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बदलत्या प्रतिमेची धास्ती वाटत असून गांधी कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी बोफोर्स सारखी जुनी प्रकाराने उघड करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरु आहे असे म्हणत शरद पवार यांनी सरकारची नीती आणि हेतूवर बोट ठेवले आहे. ते चंद्रपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले कि बोफोर्स प्रकरणी कोर्टाने राजीव गांधी ह्यांना निर्दोष म्हटले आहे. राजीव गांधी आता हयात नाहीत. शिवाय ज्या इटालियन माणसावर ठपका होता तोही आता जिवंत नाही. असे असताना पुन्हा कोर्टात खटला दाखल करून हे प्रकरण उघडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असेही ते म्हणाले.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS