Ramdas Athawale on Sharad Pawar: 'शरद पवारांनी मोदी सरकारला पाठिंबा द्यावा'; रामदास आठवलेंची मागणी

Lok Satta 2023-03-10

Views 34

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना आठवले यांनी 'प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही, असे भाकीत केले. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले असले तरी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत. ते कुठेही गेले तरी आम्हाला फरक पडत नाही' असे वक्तव्य केले. त्याचसोबत शरद पवार यांनी नागालँडमध्ये जो पाठिंबा दिला तसा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारलादेखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे असे आवाहन आठवले यांनी पवारांना केले आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS