देशातील 63% लोकांना असे वाटते कि भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर मध्ये भारतीय सैन्याची कुमक वाढवावी. न्यू रिसर्च सेंटर ने केलेल्या सर्वेक्षणात हि बाब समोर आली आहे. भारतातील अनेक लोकांचे असे मत आहे कि जम्मू आणि काश्मीर मधील आतंकवाद हा पाकिस्तान पुरस्कृत आहे. ह्यामुळे आपल्या देशाने ह्या भागात जास्तीत जास्त सेनेचा उपयोग करावा. मागील वर्षाच्या सर्वेक्षणानुसार 51% भारतीयांचे हेच मत होते परंतु ह्या वर्षी हेच प्रमाण 9% नी वाढले आहे. काश्मीर मधील अनेक अलगाववादी नेते आरोप करतात कि भारत ह्या भागात ज्यादा सैन्याचा वापर करीत आहे. एका वर्षात 100 पेक्षा जास्त आतंकवाद्यांना यमसदनी धाडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. ज्यामुळे गेल्या 5 महिन्यात अनेक दगडफेकी च्या घटना आणि प्रदर्शने झाली आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews