महिला सशक्तीकरणाची समर्थक अभिनेत्री तापसी पन्नू ने शनिवारी सोशल मिडीयावर तापसी च्या कपड्यांवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. तापसी ने एक फोटो ट्विटर वर शेअर केला. त्यात तापसी काळ्या आणि सफेद रंगाची स्त्रेपलेस परिधान केलेली दिसून येत आहे. ह्यात तिने हलका मेकअप केला आहे. ह्यावर लोकांनी फोटोचे कौतुक न करता टीका करायला सुरवात केली. मग तापसी गप्प न राहता तिने प्रत्येकाला सडेतोड उत्तर दिले. एक व्यक्तीने विचारले कि तुझ्याकडे कपडे खरेदी करायला पैसे नाहीत कि तुला अंग प्रदर्शन करायला आवडते. त्यावर तापसी ने उत्तर दिले कि ‘ तुमच्यासारखे संस्कृतीचे रक्षण करणारे आज काल मिळत नाहीत सर जी, म्हणून कोणीतरी ओळखावे ह्यासाठी असे करावे लागले, तुमच्यासारखे हिरे आजकाल शोधून हि सापडत नाहीत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews