सध्या चित्रपटसृष्टीत कोणत्या संगीतकार जोडीची सर्वांत जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे अजय- अतुल. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाला त्यांनी दिलेल्या संगीताने सर्वांनाच ‘याड लावलं’. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांमध्ये संगीत देण्याचे बऱ्याच ऑफर्सही या जोडीला मिळू लागल्या. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर सैराटचा हिंदी रिमेक ‘धडक’मध्येही ते संगीत देणार असल्याची माहिती होती. हे दोन मोठे प्रोजेक्ट हातात असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा चित्रपट अजय- अतुलला मिळाला आहे. आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटासाठी अजय- अतुल संगीत देणार असल्याची माहिती ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews