सध्या बॉलीवूडमध्ये स्टारकन्या आणि पुत्रांच्या पदार्पणाचे वारे जोरात वाहत आहे. श्रीदेवीची कन्या जान्हवी आणि सैफ-अमृताची कन्या सारा, निलीमा अझीमचा मुलगा व शाहिदचा भाऊ ईशान यांच्यापाठोपाठ आता चंकी पांडेच्या कन्येच्या पदार्पणाचीही चर्चा आहे. मिथुन चक्रवर्ती यांची कन्या दिशानीही लवकरच बॉलीवूडमध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे.
दिशानी ही मिथुन आणि योगिता बाली यांनी दत्तक घेतलेली कन्या आहे.ती अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे. सध्या दिशानी न्यूयॉर्कमधील फिल्म अकादमीमधून अभिनयाचा कोर्स करत असून चित्रपटांमध्ये स्वत:चं करिअर बनवू इच्छिते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews