जेव्हा आपण कुठे फिरायला जातो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड (माईल स्टोन) दिसतात. जे आपल्याला शहराचं नाव आणि त्याचं अंतर दर्शवतात. या दगडांना नीट पाहिलं तर लक्षात येईल की हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील. जसे काळा, पिवळा, हिरवा, पांढरा, इत्यादी. परंतु या रंगांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
दगडांच्या रंगाबाबत अनेक लोकांना फारसं माहित नाही आहे. पण या सगळ्या रंगांचा वेगवेगळा अर्थ आहे.
प्रवासाच्या दरम्यान आपण रस्त्याच्या किनाऱ्याला अनेक नारंगी-पांढऱ्या रंगाचे दगड पाहिले असतील. तर त्याचा अर्थ असा होतो की तो रस्ता 'प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने'अंतर्गत येतो. महामार्गापासून कोणत्या तरी गावाला जाणारा तो रस्ता आहे.प्रवासादरम्यान रस्त्यावर पिवळा-पांढऱ्या रंगाचा माईल स्टोन दिसला तर त्याचा अर्थ होतो की, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहात. पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड हा राष्ट्रीय महामार्गासाठी वापरले जातात.रस्त्याच्या किनाऱ्यावरील हिरवा-पांढऱ्या मैलाचा दगड अर्थ असा होतो की, आपण राज्य महामार्गावरून प्रवास करत आहोत. या रस्त्याची देखरेख करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. आपल्याला निळा-पांढरा किंवा काळा-पांढरा रंगाचा दगड दिसतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, एखाद्या मोठ्या शहराच्या तुम्ही जवळ आहात. हा रस्ता त्या शहराच्या जिल्ह्याच्या अंतर्गत असतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews