70 वर्षीय आजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आतापर्यंत या सुपर आजीने माहूरगड, वैष्णवदेवीपर्यंतचा तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे.रेखा जोगळेकर असे या सुपर आजीचे नाव असून, त्यांनी एम.ए.बी.एड पर्यंत शिक्षण घेतले आहे. आधी पासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषदेत तब्बल 30 वर्ष केंद्रप्रमुख म्हणून कामसुद्धा या सुपर आजीने केले आहे. सेवा निवृत्तीनंतर काहीतरी अनोखे करण्याची जिद्द घेऊन या सुपर आजीने गेल्या तीन वर्षापासून भारत भ्रमंतीचा प्रवास सुरू केला आहे. या वयात काहीतरी हटके करून दाखविण्याची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली असल्याचे त्या सांगतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews