महापालिकेतील विविध पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने सेवा प्रवेश नियमावली तयार केली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये महापालिकेच्या या सेवा प्रवेश नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली. मात्र, मंजुरी देताना त्यामध्ये महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या अनेक तरतुदींना शासनाने कात्री लावली. व काही नवीन तरतुदी आणि नवीन पदांचा समावेश केला आहे. मात्र, त्यामधील काही तरतुदींची अंमलबजावणी करण्यात तसेच शैक्षणिक पात्रतांचे निकष ठरविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे पालिकेकडून या सेवा प्रवेश नियमावलीत काही बदल राज्य शासनाला सुचविण्यात येणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारलेल्या मात्र, निवड न झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या वर्ग-१ च्या पदासाठी संधी देण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत बदल करण्यात येणार असून त्यात नव्या नियमाचा समावेश करण्यात येणार असल्याचे प्रशासकिय सुत्रांकडून सांगण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews