पाकिस्तानातील तीन महत्वांच्या रस्ते प्रकल्पांचा निधी रोखण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरतंर्गत (उझएउ) या तीनही रस्ते प्रकल्पांसाठी चीनकडून फंडिग करण्यात येत होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनने तात्पुरता निधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या कृतीने पाकिस्तानला जबर धक्का बसल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.
चीनकडून नवीन मार्गदर्शकतत्व जारी झाल्यानंतर पुन्हा फंडिग सुरु होईल असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले. चीनने वन बेल्ट वन रोड ही महत्वाकांक्षी योजना आखली असून 60 अब्ज डॉलर्सचा सीपीईसी प्रकल्प या योजनेतील महत्वाचा टप्पा आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्प बलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे. चीनच्या निर्णयाचा डेरा इस्माइल खान ते हॉब रोड, हुझदार ते बासीमा रोड आणि रायकोट ते थाकोट या तीन प्रकल्पाच्या कामावर परिणाम होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews