रामसेतू बद्दल अमेरिकेच्या सायन्स चॅनलच्या भूगर्भ वैज्ञानिक आणि पुरातत्व विभागाचा रिपोर्ट समोर आला आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये रामसेतू अस्तित्वात असल्याचे संकेत या रिपोर्टमध्ये देण्यात आले आहेत.भारत आणि श्रीलंके मध्ये ३० मैल क्षेत्रावर असलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे.हिंदूंचा धार्मिक ग्रंथ रामायणामध्ये भारताच्या दक्षिणेतलं रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या मन्नारद्विपमध्ये दगडांचा सेतू असल्याचा दाखला आहे. समुद्रातल्या या सेतूची खोली 3 फूट ते 30 फुटांपर्यंत आहे. या सेतूची लांबी जवळपास 48 किमी आहे. रामसेतू बाबत वैज्ञानिकांचे 6 खुलासे आहेत
1रामसेतू काल्पनिक असू शकत नाही
2 हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीरामांनी असाच सेतू बनवला.
3 भारत आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या या सेतूचे दगड तब्बल 7 हजार वर्ष जुने, आणि वाळू 4 हजार वर्ष जुनी आहे.
4 हा सेतू नैसर्गिक नाही तर माणसांनी बनवला आहे,
5 रामसेतूवर असलेले दगड खूप वेगळे आणि भरपूर प्राचीन आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews