क्षेपणास्त्राने शत्रू राष्ट्राचे क्षेपणास्त्र नष्ट करणारे सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची भारताने गुरुवारी यशस्वी चाचणी घेतली. ओडिसा येथील अब्दुल कलाम आयलंड येथून याची यशस्वी चाचणी घेतल्याचे डीआरडीओने सांगितले. शत्रू राष्ट्राने डागलेले क्षेपणास्त्र आपल्याच क्षेपणास्त्राने नष्ट करण्याचे तंत्रज्ञान भारताने आत्मसात केले आहे. असे तंत्रज्ञान असणारा भारत जगातील केवळ चौथा देश आहे. सध्या अशी क्षमता केवळ अमेरिका, रशिया आणि इस्त्रायल या देशांकडेच आहे.गुरुवारी सकाळी 9.45 मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. स्वदेशी निर्मित या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यासाठी आलेल्या पृथ्वी क्षेपणास्त्र नष्ट केले. या क्षेपणास्त्राची ही नववी चाचणी होती. या चाचणीत अब्दुल कलाम आयर्लंडवरून सोडण्यात आलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात 15 हजार किलोमीटर उंचीवरून येणारे क्षेपणास्त्र नष्ट केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews