राजकीय फायद्यासाठी भाजप खोटे बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्या साठी भाजप गुपचूप कारस्थान करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.काँग्रेस पक्षाला १३३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या देशाची पायाभरणी करणाऱ्या घटनेलाच आज भाजपपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपचे नेतेही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. घटना बदलण्या साठी गुपचूप कारस्थानं सुरू असून घटनेला वाचविण्याची आपल्यावरच जबाबदारी असल्याचंही राहुल यांनी सांगितलं.भाजप राजकीय फायद्या साठी खोटं बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण भलेही काही चांगलं केलं नसेल, भलेही आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू. पण आपण सत्याची कास सोडता कामा नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews