पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भेटीदरम्यान दोन्ही राष्ट्रांत सुरक्षा, व्यापार, ऊर्जा यासह विविध नऊ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आला. यावेळी सुंयक्त निवेदनात मोदी म्हणाले, मी २०१६ साली इराण दौऱ्यावर गेलो होतो आणि आता रोहानी भारतात आले आहेत. यामुळे परस्परसंबंधी अधिक मजबूत होतील. भारत आणि इराण हे दोन्हीही अफगाणिस्तान या शेजारी राष्ट्रास दहशतवादमुक्त करू इच्छित आहोत. चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत कटिबद्ध असून बंदरासाठी इराणने केलेल्या सहकार्याबद्दल भारतातर्फे मी इराणचे आभार मानतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews