३१ डिसेंबर रोजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मडगाववरून कुमता येथील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी रस्ते मार्गाऐवजी रेल्वेने जाण्याचे ठरवले. १४४ किलोमीटरच्या या प्रवासासाठी लगेच त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना या मार्गावरील ट्रेन्सची माहिती काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी जबलपूर-कोईम्बतूर एक्सप्रेसचे तिकीट काढले. मुख्यमंत्री ट्रेनच्या वेळापत्रका नुसार मडगाव स्थानकात पोहचले. मात्र जबलपूर-कोईम्बतूर एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा उशीरा येणार होती. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानकात उभ्या असलेल्या मंगळूर पॅसेंजर एक्स्प्रेसला विशेष डब्बा जोडण्याची तयारी दाखवली. मात्र, पर्रिकरांनी आपण सेकंड क्लास मधूनच प्रवास करायचे ठरवले. साहजिकच मुख्यमंत्री सेकंड क्लासने प्रवास करणार असल्याने रेल्वे अधिकाऱ्यां ची धावपळ झाली, त्यांना किंचित धास्तीही वाटली असावी. मात्र, पर्रिकर यांनी अगदी आनंदात हा प्रवास केला. त्यांनी प्रवासादरम्यान सहप्रवाशांबरोबर गप्पा तर मारल्याच आणि प्रवाशां सोबत सेल्फीही काढले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews