भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यासंदर्भात मिडीयाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दोषींना सोडणार नसल्याचा इशारा दिला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आधीच घोषित करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाला त्याबाबत विनंती करणारे पत्र देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले हिंसाचाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या हिंसाचारात जे कोणी आढळतील त्यांना सोडणार नाही. या प्रकरणाचे व्हिडिओ फुटेज तपासण्यात येत आहे. यात दोषी आढळणाऱ्या सर्व कठोर कारवाई करणार, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews