चीनमध्ये एका कारच्या शो रूममध्ये कार खरेदीसाठी एक व्यक्ती आला. त्याने कारची टेस्ट ड्राइव्ह घेतली, कार सिलेक्ट केली. त्यानंतर पैसे द्यायची वेळ आली तेव्हा त्याने कारचे डाऊन पेमेंट हे चिल्लरच्या स्वरूपात देणार अशी अट ठेवली. या कारची किंमत सुमारे ४० लाख रुपये होती. त्यामुळे आपली कार विकली जाते हे पाहून शो रूमने त्याची अट मान्य केली. त्यांना वाटले की १ हजार दोन हजार रुपयांची चिल्लर आणेल. पण या महाशयाने तब्बल ६ लाख रुपयांची चिल्लर शो रूममध्ये आणून टाकली.
सहा लाखांची चिल्लर पाहून शो रूमच्या कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. तब्बल ४ तास ही चिल्लर मोजायला लागली. यासठी शो रूमचे सर्व कर्मचारी कामाला लागले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews