ओडिशामध्ये मात्र मुलांच्या शिक्षणाचं ‘वेड’ डोक्यात घेतलेल्या जालंधर नायक यांनी चक्क डोंगर हलवलाय! मुलांच्या शिक्षणाच्या वाटेवर अडथळा ठरणारा गुमसाही गावाजवळचा डोंगर फोडून फुलबनी शहरापर्यंतचा रस्ता त्यांनी एकट्याने तयार केला आहे. बिहारमधील दशरथ मांझी या अवलियानेही असाच एकट्याने २२ वर्षे डोंगर फोडून रस्ता तयार केला होता!जिल्हा प्रशासनानेही या कामाची दखल घेतली असून आता त्यांना ‘मनरेगा’ योजनेखाली या कष्टांचा मोबदला दिला जाणार आहे. ‘नायक यांच्या कामाबद्दलची निष्ठा आणि त्यांनी त्यांसाठी घेतलेले प्रचंड कष्ट पाहून मी भारावले आहे,’ असे जिल्हाधिकारी वृंदा डी. यांनी सांगितले.दोन वर्षे सतत कष्ट करून त्यांनी डोंगर फोडून ८ किमी रस्ता तयार केला. आता पुढच्या तीन वर्षांत आणि ७ किमी रस्ता तयार करण्याचं नायक यांनी पक्कं ठरवलं आहे. आदिवासी समाजात जन्माला आलेल्या ४५ वर्षांच्या नायक यांना कधी शाळेचं तोंडही पाहता आलं नाही; म्हणून आपल्या तीन मुलांना कितीही अडथळे आले तरी शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews