सुपरफिट अक्षय कुमार त्याची शिस्त, वेळ पाळण्याची सवय आणि फिटनेससाठी ओळखला जातो. अक्षय आपल्या मुलांशी खेळकर वृत्तीने वागतो. त्याचे असे म्हणणे आहे की, आपण मुलांवर कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी त्याच्यावर सातत्याने दबाव टाकणे किंवा एखादी गोष्ट सारखी सारखी सांगणे चुकीचे आहे.तुम्ही तुमच्या वागण्यातून मुलांवर संस्कार करा.तुम्हाला पाहुन त्यांना स्वतःला चांगल्या गोष्टींचे महत्त्व पटायला हवे. वेळेवर उठणे, कोठेही जाताना वेळेवर जाणे महत्त्वाचे आहे त्यामुळेच तुमची कामे वेळेवर पूर्ण होतात. आयुष्यात या गोष्टीचे महत्त्व अक्षयला त्याच्या वडीलांनी शिकवले होते. माझ्या याच सर्व गोष्टी माझ्या मुलांनीही शिकाव्या अशी माझी इच्छा असल्याचे अक्षय म्हणाला. माझ्या शिस्तप्रियते आणि फिटनेस मुळेच मी एका वेळी चार चित्रपट आणि इतर कामही करू शकतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews