नियमीत पणे कोबीचा वापर अहारात केला तर, पोट साफ राहते. बद्धकोश, पोटफूगी, पोटदुखी, गॅस असे प्रकार कमी होतात. जेवताना सॅलड म्हणूनही कोबीचा वापर केला जातो.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरातील पचनक्रीया सुरूळीत पार पडते. ताज्या कोबीचे बारीक तुकडे करून त्यात आवश्यकते नुसार मीठ, काळी मिर्ची आणि लिंबाचा रस टाकून दररोज सकाळी नियमीत सेवन केल्याने बद्धकोष्टतेची समस्या कमी होते.व्हिटॅमिन यू हे एक दुर्मिळ व्हिटॅमीन असून, ते तुम्हाला ताज्या कोबीच्या रसात मुबलक प्रमाणात मिळू शकते. हे व्हिटॅमिन अल्सर प्रतिरोधक म्हणूनही गुणकारी मानले जाते.एखाद्या व्यक्तीस एखाद्या पदार्थाची एलर्जी किंवा इतर त्रास असू शकतो. त्यामुळे हे वाचून प्रयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews