आधार कार्डमधील माहिती चोरी होत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होते.आधार कार्डमधील माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा यूआयडीए आयने कायमच केला आहे. ती माहिती लीक होणं शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मात्र तरीही खासगी सुरक्षेचं कारण पुढे करत यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडीची घोषणा केली आहे.सध्या जे आधार कार्ड आहे, त्यात एकूण 12 अंक असतात. मात्र व्हर्च्युअल कार्डमध्ये 16 अंक असतील.
कुणीही नागरिक यूआयडीए आयच्या वेबसाईटवर जाऊन आधीच्याच आधार कार्डच्या माहितीवरुन व्हर्च्युअल आयडी बनवू शकतो. ज्यांच्याकडे सध्या आधार कार्ड आहे, त्यांनाच हे शक्य आहे.16 अंकांचं हे व्हर्च्युअल आयडी ठराविक वेळेपुरते मर्यादित असेल. त्यामुळे मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्युअल आयडी बनवावं लागेल.आधार कार्ड ज्याप्रमाणे ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं, त्याच धर्तीवर व्हर्च्युअल आयडीही ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews