पद्मावती सिनेमाचे नाव 'पद्मावत' ठेवण्यात आले असले तरी राजस्थान सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदी कायम ठेवली आहे. भन्साळीच्या 'पद्मावत'मध्ये सेन्सॉर बोर्डाने ५ बदल सुचविल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात 'पद्मावत'मध्ये पाच नसून ३००हून अधिक बदल करण्यात आले आहेत. शिवाय दिल्ली, मेवाड आणि चित्तोड या शहरांची नावेही सिनेमातून वगळण्यात आली आहेत, त्यामुळे सिनेमाची कथा नेमकी कुठे घडते तेच प्रेक्षकांना शेवटपर्यंत कळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.दीपिका पादुकोणच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा गेल्या वर्षाभरापासून वादात अडकला आहे. 'पद्मावत' १ डिसेंबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार होता. काही संघटनांनी विरोध केल्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. मात्र सेन्सॉर बोर्डाने बदल सुचविल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी देण्यात आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews